काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

भोपाळ| मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली तर राज्यपाल लालजी टंडन सुटी संपवून राजधानी भोपाळला पोहोचत आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र त्यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केले आहे. हे पत्र 9 मार्चला लिहिल्याचे दिसून येते.

काँग्रेसच्या आमदारांना बंगळुरुला घेऊन जाणाऱ्या विमानांचा खर्च भाजपनेच केला होता. कमलनाथ सरकारने मध्य प्रदेशातील माफियांविरोधात कारवाई केल्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.

सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याच्या दाम्पत्याला कोरोनाची लागण, दोघेही पॉझिटिव्ह- राजेश टोपे

-“आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा”

-पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

-गो कोरोना, कोरोना गो… रामदास आठवलेंची चीनी नागरिकांसोबत घोषणाबाजी; पाहा व्हिडीओ

-“आमच्यासाठी जी व्यक्ती चांगली ती शेवटपर्यंत चांगली असते”