महाराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग

आमदार नितेश राणेंना कोर्टाचा दणका…! आता आणखी 5 दिवस खावी लागणार जेलची हवा

nitesh Rane 214

सिंधुदुर्ग |  रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यावर चिखलफेक करून धक्काबुकी केल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंना कोर्टाने दणका दिला आहे. काल कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्य़ावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

नेमक काय आहे हे प्रकरण-

काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्य़ांच्या कार्यकर्त्यांनी गडनदीवरील पुलाला खड्डे पडल्याच्या कारणास्तव संबंधित अभियंत्याला चिखलाने अंघोळ घातली अन् त्यानंतर त्यांनी प्रकाश शेडेकर या उप-अभियंत्याला पुलाला बांधून ठेवलं.

पुलाला खड्डे कसे काय पडले, असं विचारता-विचारता त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला एकेरी भाषेचा वापर चालू केला. हायवे सर्विस रोड तुझा बाप बांधणार का? अशा शब्दात त्यांनी अभियंत्याला सुनावलं. नंतर हे प्रकरण चांगलंच वाढत गेलं.

सर्वसामान्य जनता रोज मनस्तापाला सामोरं जाते आज तू चिखलाचा मारा सहन कर… असं म्हणत यानंतर नितेश राणे यांनी त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती.

नितेश राणे यांनी धारण केलं होतं आक्रमक रूप-

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरूस्तीचे काम पाहण्यासाठी आता मी रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहतो… बघतो सरकार काय करतंय मला, असं आक्रमक रूप नितेश राणे यांनी धारण केलं होतं.

दररोज सकाळी मी 7 वाजता पोहचेल. मला बघायचे आहे सरकार आमच्या विरूद्ध जिंकूच कसे शकते?? अशा शब्दात नितेश राणे यांनी सरकारला आव्हान दिलं होतं.

दरम्यान, सरकारच्या मुजोरपणाला कसा लगाम घालायचा हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे, असं ते म्हणाले होते.

अधिकाऱ्यांचं म्हणण काय होतं??- 

संबंधित उप-अभियंत्याने या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सक्रिय होत नितेश राणे यांना ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणी जेष्ठ नेते नारायण राणे यांनी माफी मागितली-

नितेश राणे यांच्या या कारन्याम्याबद्दल खुद्द नारायण राणे यांनी माफी मागितली आहे. नितेशने असं करायला नको होतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमदार नितेश राणे यांना अधिकाऱ्यांवरचं चिखलफेक आणि धक्काबुक्की प्रकरण चांगलंच भोवलेलं दिसतंय. या आंदोलनापाठीमागे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच गणीत कारणीभूत आहे, असंही बोललं जातंय.