महाराष्ट्र मुंबई

शिवसेना आणि भाजपला मोठा धक्का; कपिल पाटलांनी बाजी मारली

Kapil Patil

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकभारतीच्या कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना कपिल पाटील यांनी पराभवाची धूळ चारली आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार कपिल पाटील पुन्हा उभे राहिले होते. त्यांना शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांचे मोठे आव्हान होते. दुसरीकडे भाजपने अपक्ष उमेदवार अनिल देशमुख यांना आपला पाठिंबा दिला होता, त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली होती.

मुंबई शिक्षक मतदारसंघात एकूण 8 हजार मतदान झालं होतं. यापैकी एकट्या कपिल पाटील यांना 4 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत. तर उरलेली मतं शिवसेना आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांमध्ये विभागली गेली आहेत. 

दरम्यान, या निवडणुकीत पाकिटं पोहोचल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेनेने संस्थाचालकांच्या बैठका घेतल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. त्यानंतरही कपिल पाटील यांनी हा विजय मिळवला आहे.