कर्नाटकमध्ये भूकंप होणार?; नाराज भाजप आमदारांची बैठक

बंगळुरू | भाजपचे काही आमदार विद्यमान मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. कर्नाटक भाजपमधील काही आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर राज्यात पर्यायी नेतृत्व उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

येडियुरप्पा यांना अन्य कुठला पर्याय असू शकत नाही असे हायकमांडचे मत आहे. पण जे आमदार भेटले व फोनवरुन चर्चा केली, त्यांच्यामध्ये बासनगौडा पाटील  आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.

कोरोना व्हायरसच्या या संकटकाळात येडियुरप्पा यांनी आपल्या आमदारांबरोबर कुठलीही चर्चा केलेली नाही तसेच आमदारांच्या मतदारसंघात काय सुरु आहे याची सुद्धा त्यांना अजिबात चिंता नाही, असे आरोप मुख्यमंत्र्यांवर करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री त्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत, असं आमदारांना वाटतं. वयोमानामुळे येडियुरप्पा यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम झालाय असं काही भाजप आमदारांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रात, पत्रात म्हणतात…

-अक्षय बोऱ्हाडे गुन्हेगारी टोळ्यांशी परिचीत आहे- तृप्ती देसाई

-“कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचं सुदैव”

-केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?

-पुण्यातल्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरणार, महापालिका उभारणार नवी घरं…