धक्कादायक! KGF 2 फेम अभिनेत्याचं निधन; बंगळुरूमध्ये घेतला अखेरचा श्वास

मुंबई | KGF Chapter 2 फेम अभिनेता मोहन जुनेजा यांचे 7 मे 2022 रोजी सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. आपल्या कॉमेडीने लोकांना हसवणाऱ्या मोहनने आज सर्वांचे डोळे पाणावत हे जग सोडलं आहे.

मोहन जुनेजा यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावरआज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोहन यांच्या जाण्यानंतर त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील त्यांचे सहकारी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

मोहन यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं. महाविद्यालयीन काळात त्यांनी नाटकांमध्येही भाग घेतला.

2008 मध्ये ‘संगमा’ या रोमँटिक कन्नड सिनेमातून करिअरला सुरुवात केली. याचं दिग्दर्शन रवी वर्मा गुब्बी यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला 

IAS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याला अटक होण्याची शक्यता

“मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण…” 

सपना चौधरीच्या ‘या’ गाण्यावर तरुणाई फिदा, 32 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला व्हिडीओ