Top news महाराष्ट्र मुंबई

“दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो”

Kirit Somayya

मुंबई | अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनबाहेर दगडफेक झाली.

या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झाली आहे. आता या घटनेवरून राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. भाजप नेत्यांनी या घटनेचा निषेध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केलीये.

हल्ल्यानंतर रविवारी किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांवर आणि ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तसेच शिवसैनिकांनी फेकलेला दगड जरा वरती लागला असता तर मी कायमचा आंधळा झालो असतो, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

ठाकरे सरकारने माझा मनसुख हिरेन करायचा प्लॅन आखला होता. पण देव आणि मोदी सरकारच्या कृपेमुळे माझा जीव वाचला, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

या सगळ्याविरोधात मी केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. भाजपचे शिष्टमंडळ सोमवारी केंद्रीय गृहसचिवांना भेटण्यासाठी दिल्लीत जाणार आहे, असंही सोमय्यांनी सांगितलं आहे.

माझ्यावरील कालचा हल्ला हा ठाकरे सरकार स्पॉन्सर्ड होता. मी पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता येणारे हे मी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार शिवसेनेचे 70 ते 80 गुंड अगोदरच पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. 80 जणांनी माझ्यांवर हल्ला केला, असं सोमय्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप 

“मातोश्रीत बसलेल्या मर्दानी फक्त 24 तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…” 

“….तर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही” 

‘…हे खपवून घेतलं जाणार नाही’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला अत्यंत गंभीर इशारा 

Russia-Ukrain War | युक्रेनमध्ये पुतिन यांचा शेवटचा सामना?; रशियन जनरलचा मोठा खुलासा