एका नगरसेवकाने घेतली दुसऱ्या नगरसेवकाची पप्पी; कोल्हापूर महापालिकेतला प्रकार

कोल्हापूर | महापालिकेची सर्वसाधारण सभा म्हटल्यावर गोंधळाचं वातावरण असणार हे नक्की असतं. मात्र कोल्हापूर महानगरपालिका याला आज अपवाद ठरली. कारण महापालिकेतच एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाचं चुंबन घेतलं. या घटनेने सगळेजण आश्चर्यचकित झाले.

महापालिकेच्या विरोधी पक्षाचे म्हणजेच ताराराणी आघाडीचे सदस्य कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकांवर जाऊन बसले होते. त्यांच्या जवळच काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख बसले होते. त्यांच्यात कुठल्या तरी विषयावर चर्चा झाली अन् काही कळायच्या आतच भोपळेंनी देशमुखांचं चुंबन घेतलं.

सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव सुरू होते. याचदरम्यान हा प्रकार घडल्याने सभागृहातील सगळ्या नगरसेवकांचं लक्ष भोपळे आणि देशमुख यांनी वेधून घेतलं. तर सभागृहात उपस्थित असलेल्या महिला सदस्या मात्र लाजेने चुर्र झाल्या.

सोशल मीडियावर हा व्हीडिओ वेगाने व्हायरल होत आहे. म्हणतात ना राजकारणात काहीही अशक्य नाही. आज घडलेल्या प्रकाराने विरोधी पक्ष- आणि सत्ताधारी पक्षांमधल्या सदस्यांच्या प्रेमाचं दर्शन सगळ्यांना झालंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुकाराम मुंढेंची धडाक्यात कामाला सुरूवात; दिला 4 कर्मचाऱ्यांना दिला

-नथुराम गोडसेला मानतो हे सांगायची मोदींमध्ये धमक नाही – राहुल गांधी

-कोरोना व्हायरस भारतात दाखल; केरळमध्ये पहिला रूग्ण आढळला

-देशप्रेमी नागरिकांनी मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं; बाळा नांदगावकरांचं आवाहन

-राज ठाकरेंच्या इंजिनाला भाजपचं इंधन?? राज आणि आशिष शेलार यांची तासभर चर्चा