कवी कुमार विश्वास यांची फॉर्चुनर गाडी चोरीला

नवी दिल्ली |  प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची घराबाहेर लावलेली फॉर्चुनर गाडी चोरीला गेली आहे. रातोरात चोरट्यांनी त्यांची गाडी पळवली आहे. ही गाडी रात्री एक-दीडच्या आसपास चोरीला गेल्याचा संशय आहे.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे तसंच चौकशीसाठी पथकंही स्थापन केली आहे. दिवस उजाडल्यानंतर विश्वास यांच्या घरच्यांना गाडी दाराबाहेर नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

पोलिसांनी झालेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. लवकरात लवकर आरोपींना जगाआड करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पोलिसांनी घटनेबाबत विश्वास यांच्या शेजाऱ्यांचीही चौकशी केली आहे. तसंच आरोपींना जेरबंद करण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलत असल्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना मोठा पाठिंबा!

-नाशिक जिल्ह्याच्या शाळांमध्ये वीजेची तक्रार; शिक्षणमंत्र्यांचे कार्यवाहीचे आदेश

-…म्हणून आता इंदुरीकर महाराज ‘बाऊन्सर’ घेवून फिरणार!

-“गद्दारांना माझ्या पक्षात जागा नाही, दोन दिवसात गद्दारांची हाकालपट्टी होईल”

-राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार!