महाराष्ट्र मुंबई

महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!

मुंबई | राज्यात कोरोनाचा CoronaVirus प्रभाव अजूनही वाढताच आहे. या काळात डॉक्टर आणि पोलीस आपल्या प्रयत्नांची शर्थ लावून या रोगाशी लढा देण्याचं काम करत आहेत. अशाच एका महिला पोलिसाचा Maharashtra Police कौतुकास्पद प्रकार समोर आला आहे.

महिला पोलीस अंमलदार संध्या शीलवंत Sandhya Sheelwant यांनी एकाच दिवशी 4 बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. आपल्या या कृतीने त्यांनी खाकी वर्दीत असलेल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहेय.

संध्या मृतदेहांची नोंद करण्याचं काम करण्यासोबतच मृतांच्या कुटुंबाचाही शोध घेतात. पण सध्या लॉकडाऊनमध्ये कोणीही मृतदेह घेण्यासाठी आलं नसल्याने त्यांनी स्वत: मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.  सध्या कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्याने लोक आपल्या जवळच्या माणसांनाही विचारायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत संध्या यांनी केलेलं काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

दरम्यान, विक्रोळीमध्ये पती, 13 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा आणि सासू सासरे असं संध्या यांचं कुटुंब आहे. संध्या या शाहूनगर पोलीस ठाण्यात एडीआर कारकून म्हणून कार्यरत आहे. या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी 6 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. त्यांच्या या कर्तव्यामुळे त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संध्या यांच्या कामाला प्रत्येकानं सलाम करायला हवा.

महत्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना दणका, उचललं ‘हे’ पाऊल

-“नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा”

-कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा धक्का; आवडता लोकगीत गायक हिरावला!

-निलेश राणे-रोहित पवार वादात जयंत पाटलांची उडी; रोहित पवारांना दिला हा सल्ला

-सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा; प्रकाश आंबेडकर यांची मागणी