सातारा | मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाला समजावून सांगावे. नाहीतर त्यांना अटक करावी. त्याचबरोबर गरज पडल्यास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करेन, असा इशारा ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी दिला आहे.
सातारा येथील शासकीय विश्रामृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांच्या पाठिशी मूठभर वर्ग सोडला तर कोणी नाही. त्यांच्याकडून दोन धर्मात द्वेष पसरविण्याचेच काम सुरु आहे, असं लक्ष्मण माने म्हणालेत.
कोणाची तरी सुपारी घेऊन राज ठाकरे हे काम करत आहेत. आजोबांकडून त्यांनी काही तरी शिकायला हवं होतं, असंही लक्ष्मण माने म्हणाले.
राज ठाकरे यांनी देश, समाजासाठी काय केले ? ते नकलाच करतात. भोंग्यावरुन बोलतात. हे भोंगे आता लागले आहेत का?, असा सवाल त्यांनी केलाय.
संविधानावर आक्रमण करुन भाजपने धुडगूस घातला आहे. यालाही थांबवण्याची गरज आहे. कारण, हिंदू राष्ट्र कधीच अस्तित्वात येऊ शकत नाही, असं त्यांनी म्हटलंय.
भाजपनेही लोकांची फसवणूक करण्याचा धंदा बंद करावा, असंह म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“जयंत पाटील भाजपमध्ये येणार होते”; केंद्रीय मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट
ईडीवरून गोंधळ सुरूच! संजय राऊतांचा भाजपला गंभीर इशारा, म्हणाले…
“तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही इतकं महत्त्व देताच कशाला”
मलिकांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाचा मोठा दणका
“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”