धक्कादायक! तृथीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग

गुरुदासपुर- तृथीयपंथी म्हणल की आपणाला आठवतो शहरातला गजबजलेला सिग्नल कींवा रेल्वेचा डबा. आणि त्या डब्यात पैसे मागायला येणारे तृथीयपंथी कोणी आदराने तर कोणी नाईलाजाने यांना पैसे देउन टाकतात. कोणी म्हणत यांचा शाप लागतो तर कोणाला हेच शिव्या देतात म्हणजे काय तर हे मागतील ते त्यांना द्यायच. पण यांच तृथीयपंथीयांशी  मैत्री करणाऱ्या एकाला मात्र त्यांची मैत्री चांगलीच अंगलट आली आहे. तृथीयपंथीयांनी मैत्री केलेल्या तरुणाच गुप्तांगच कापल्याचा धक्कादायक प्रकार गुरुदासपुर मध्ये उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार पीडीत तरुणाला जागरणाची आवड होती. तो जागरणाला गेला असतानाच त्याची आणि त्या दोन तृथीयपंथीयांची आळख झाली होती. त्यातील एकीच नाव सोनिया तर दुसऱ्यांच परवीन अशी आहेत. यांची ओळख झाल्यावर ते पीडीत तरुणाला अधुन मधुन त्यांच्या घरी घेऊन जायचे.

एक दिवस त्यांनी त्या युवकाला अमली पदार्थ चारले आणि तो त्या नशेत असतानाच त्याचे गुप्तांग कापले. तर ते जेंव्हा जेंव्हा त्या तरुणाला घरी घेईन जायचे तेव्हा सोनिया त्याला मारहान करायची असही माहीती समोर आली आहे.

दरम्यान,या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना एसएचओ गुरदासपूर जबरजित सिंग यांनी सांगितले की, पीडित तरुणाच्या आईच्या वक्तव्याच्या आधारे त्या तृथीयपंथीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तृतीयपंथांवर भादंवि कलम 326, 342, 328, 506, 120 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पण सध्या ते दोनही तृथीयपंथी फरार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-माझ्या आईला त्यांने असं मारल, मुलीनेच सांगितले ‘त्या’ रात्रीच रहस्य

-मुलांसोबत खेळली म्हणून बापाने केली मुलीलाअमानुष शिक्षा, मुलीची आत्महत्या