पुणे महाराष्ट्र

पुणे शहर आणि जिल्ह्यात दारुची दुकाने सुरु होणार का?; आला महत्त्वाचा निर्णय

पुणे | राज्य सरकारनं रेड झोनमधील कंटेन्मेंट क्षेत्र वगळता इतर दुकानांसह दारूची दुकानंही खुली करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहर आणि जिल्हा हा रेड झोनमध्ये येत असला तरी, तिथे दारूची दुकानं किंवा दारूची विक्री बंदच राहणार आहे.

मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितलंय. मद्यविक्रीची दुकाने सुरू होणार का?, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था असताना अधीक्षक झगडे यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत मद्यविक्रीवर बंदी असल्याचे आदेश काढले होते. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी हा 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत, असं झगडे म्हणाले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील बिअर बार आणि परमीट रूम हे सुरुवातीला बंद करण्यात आले होते. त्यानंतर मद्यविक्रीच्या दुकानांसमोर गर्दी होऊ लागल्याने मद्य विक्रीची दुकाने 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी काढले होते. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत हॉटेल, बिअर बार, परमीट रूम आणि मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

-जागा चार, नावं सात… ‘या’ नावांपैकी भाजप नेमकी कुणाला देणार संधी?

-काय सांगता??? फेसबुकवर आता चक्क पैसे कमवण्याची संधी

-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

-“मुंबई-पुण्यातील शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा”

-IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही- पृथ्वीराज चव्हाण