Top news पुणे

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत खाकी वर्दीवर हात; अजित पवार काय कारवाई करणार याकडे लक्ष

बारामती |  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे सर्व देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र काहीजण नियमांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे. अशात उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत शहरात पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

होम क्वारंटाईन असलेल्या लोकांना बाहेर फिरण्यास मज्जाव करणाऱ्या स्थानिक युवकांना मारहाण करून नंतर पोलिस पथकाला मारहाण केल्याची माहिती समजत आहे. मारहाणीमध्ये बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत.

बारामती शहरातील जळोची येथील काही नागरिकांनाही आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तसा शिक्काही या नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे. काल दुपारी हे नागरिक परिसरात फिरत असताना त्यांना स्थानिक तरुणांनी त्यांना बाहेर फिरण्यास मज्जाव केला.

होम क्वारंटाईन असताना बाहेर फिरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नये अशी विनंती या तरुणांनी केली. त्यावरून स्थानिक तरुण आणि या होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्यात वादावादी झाली. यात त्यांनी काही युवकांना मारहाण केली. यांची माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे न ऐकता होम क्वारंटाईन असलेल्या गटाने पोलिसांवरच हल्ला चढवला.

महत्वाच्या बातम्या –

-पोलीसदेखील एक माणूस आहे, त्यांच्यावर किती ताण देणार- जयंत पाटील

-कॉरंन्टाईनचा शिक्का असताना फिरत होता; शासनाने हुकलेल्या कलेक्टरला केलं निलंबित!

-विश्वास नांगरे-पाटील अॅक्शनमोडमध्ये; आता येऊन दाखवा बाहेर

-टी-20 विश्वकप विजेत्या टीमचा शिलेदार जोगिंदर शर्मासह ‘हे’ नामवंत खेळाडू कोरोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी

-‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री