महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले- माधव भंडारी

मुंबई | जालना जिल्ह्यात 51 हेक्टर जमीन राज्य सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला दिली असल्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. यावरून भूखंडाचं श्रीखंड’ हा शब्दप्रयोग शरद पवारांमुळेच महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला मिळाला असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे.

वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला अगदी कमी दरात जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महराष्ट्रात पवारांचे राज्य पुन्हा सुरु झाले असल्याचा हा थेट पुरावा आहे, अशी टीकाही भंडारींनी केली आहे.

ज्या-ज्या वेळी शरद पवार सत्तेत आले, त्यांनी त्या-त्या वेळी आपल्या संस्थाना,आपल्या जवळच्या आणि आसपासच्या लोकांना शासकीय जमिनींची खिरापत वाटली. आता पुन्हा तेच उद्योग सुरु झाले असल्याचा आरोप भंडारी यांनी केला आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रदूषणासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत येताहेत हे दुर्दैव- राजू पाटील

-महिला अत्याचाराची गृहमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल; राबवणार ‘आंध्र पॅटर्न’!!

-आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ‘दिशा’ कायदा आणणार; अनिल देशमुखांची घोषणा

-CAA आणि NPR च्या विरोधामागे मतांचं राजकारण; मोदींचा आरोप

-पाकमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचा अमेरिकेने नोंदवला निषेध