आज बारावीचा निकाल; या तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल!

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याबद्दल विद्यार्थांना उत्सुकता होती. सोशल माध्यामांवर मागील काही दिवस परीक्षेच्या निकालाच्या अनेक तारखा व्हायरल होत होत्या. त्यामुळे विद्यार्थांमध्ये तारखेबद्दल संभ्रम होता आणि पालकही चिंतेत होते. परंतू आज दुपारी 1 च्या नंतर एचएससी बोर्डाचा निकाल लागणार आहे.

मंडळाने हा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटची यादी जारी केली आहे.  या वेबसाईटवर निकाल कशाप्रकारे पहायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

वरती दिलेल्या या तीन वेबसाईटवर आपल्याला निकाल पाहता येणार आहे. त्यासोबतच www.maharashtraeducation.com वर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच निकालाबद्दलची इतर आकडेवारी उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, असं मंडळाने स्पष्ट केलं आहे.

यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजारांनी अधिक आहे. 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज झाली आहे.