आषाढी एकादशीला विठूरायाच्या दर्शनाला जाणार का?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले …

मुंबई | देशासह राज्यभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. यावरील उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी येत्या आषाठी एकादशीला वारकरी म्हणून तसंच जनतेचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले, “आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणार आहे. वारीची परंपरा ही सातशे-आठशे वर्षांची आहे. यापूर्वी मी वारी पाहिली आहे. पण त्यावेळी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही. हेलिकॉप्टरमधून मी विठ्ठलाचं विश्वरूप पाहिलं आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “हजारो वारकरी रिंगण करून विठ्ठलाचं नामस्मरण करतात. यंदा मी मुख्यमंत्री म्हणूनच नाही, तर वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. या संकटातून बाहेर काढण्याचं साकड विठ्ठलाला घालणार आहे.”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी मंडळांनी कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यानंतर गणेशोत्सव तसंच नवरात्र हे उत्सवही सामाजिक भान ठेऊन साजरे करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आपण सर्व एकत्र येऊन यातून मार्ग काढू आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त करू, अशा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

महत्वाच्या बातम्या-

-‘खरं राजकारण तर…’; शरद पवारांच्या त्या टीकेला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

-30 जूननंतर लॉकडाउन उठणार का?, उद्धव ठाकरे म्हणाले…

-पांडुरंग समजून पोलिसाचे पाय धरणारा वारकरी; सोशल मीडियावर व्हीडिओ तुफान व्हायरल

-आपल्या मुलांसाठी देश लुटायला कोणतीही कसर सोडली नाही, स्मृती इराणींचा सोनियांवर हल्लाबोल

-…म्हणून नागपुर, मालेगाव आणि धारावीतला कोरोना आटोक्यात, राजेश टोपेंचा महत्त्वाचा खुलासा