देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश

नवी दिल्ली | देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे.

या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के असल्याचं म्हटलं आहे.  तर उद्धव ठाकरे यांचा समावेश देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये झाला आहे.

आयएएनएस आणि सी व्होटर्सने देशभारातील वेगवेगळ्या राज्यांमधील जनतेकडून राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील नेत्यांच्या लोकप्रियतेबद्दल जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर बहुतांशी मतदारांनी शिक्कामोर्तब केलंय.

66.20 टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवली तर 23.21 टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पसंत असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“आभाळ जरी कोसळलं तरी…, महाराष्ट्रा काळजी घे”

-चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात

-“आप्पा… तुम्ही अंगीकारलेला लोकसेवेचा वसा मी पुढे सुरू ठेवणार हा माझा शब्द”

-‘या’ दोन माजी आमदारांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

-संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ सज्ज; 40,000 नागरिकांना हलवलं