Top news आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला

मुंबई | महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. यात काही प्रमाणात शिथीलता देण्यात आल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असंही नमूद केलं. त्यानुसार या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.

सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे. केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही. तर प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावं, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत, असं सांगण्यात आलं आहे.

सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान 15 कर्मचारी यामध्ये काम करतील..

 

महत्वाच्या बातम्या-

-‘जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच’; मनसेचा शिवसेनेला इशारा

-धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

-शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात

-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…