पोलीसदेखील एक माणूस आहे, त्यांच्यावर किती ताण देणार- जयंत पाटील

मुंबई | आपल्याला काही होणार नाही असं समजून बाहेर पडू नका. पोलीस देखील एक माणूसच आहे. त्यांच्यावर किती ताण द्यायचा. घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

कृपया या दिवसांमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधीही बाहेर पडतो त्याच्यासोबत अनेक लोक बाहेर फिरतात. त्यांच्यासोबत असलेल्यांपैकी कोण पॉझिटिव्ह आहे हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवं असा सल्ला पाटील यांनी दिला.

आपल्याला काही होणार नाही असं समजून कोणीही घराबाहेर बाहेर पडू नका. बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार. पोलीस देखील एक माणूस आहे. त्यामुळे आपणच घराबाहेर न पडणं योग्य आहे, असंही पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, बाजार समितीतही लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. लोकं त्या ठिकाणी गर्दी का करत आहेत हे समजत नाही. लोकांनी आपल्याला शिस्त लावून घेतली पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या –

-कॉरंन्टाईनचा शिक्का असताना फिरत होता; शासनाने हुकलेल्या कलेक्टरला केलं निलंबित!

-विश्वास नांगरे-पाटील अॅक्शनमोडमध्ये; आता येऊन दाखवा बाहेर

-टी-20 विश्वकप विजेत्या टीमचा शिलेदार जोगिंदर शर्मासह ‘हे’ नामवंत खेळाडू कोरोना विरुद्धच्या लढाईत करताहेत पोलीस ड्युटी

-‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री

-गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे