महाराष्ट्र मुंबई

राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यासारख्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 361 पोलीस कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात 361 पोलिसांना कोरोना झाला आहे. आज 3 मे जवळपास 19 पोलिसांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 342 वरुन 361 वर गेली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांपैकी 49 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 309 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तर 3 पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“IFSC सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल”

-‘रडीचा डाव खेळू नका’; जयंत पाटलांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

-“IFSC च्या निमित्ताने ‘महाराष्ट्र विरुद्ध गुजरात’ अशी नवी स्क्रिप्ट लिहिली जातीये परंतू जनता मूर्ख नाही

-….तरच तुम्हाला प्रवासाचा पास मिळू शकतो, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

-IFSC गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून, शरद पवारांच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र