कोरोनाचा महाराष्ट्राला मोठा धक्का; आवडता लोकगीत गायक हिरावला!

मुंबई | अवघ्या महाराष्ट्राला आपल्या आवाजानं वेड लावणाऱ्या गायक छगन चौगुले यांचं निधन झालं आहे.  कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

छगन चौगुले यांना कोरोनाची लक्षणं दिसून आली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कोरोनाशी झुंज देण्यात ते अपयशी ठरले.

छगन चौगुले आपल्या खास लोकगीतांसाठी प्रसिद्ध होते. नवरी नटली हे त्यांचं लोकगीत खास लोकप्रिय होतं. महाराष्ट्राच्या घराघरात आजही हे गीत आपल्याला वाजत असल्याचं पहायला मिळतं.

नवरी नटली सोबतच ‘मांढरदेवी काळुबाईची कथा’ हा त्यांना अल्बम चांगलाच प्रसिद्ध होता. याशिवाय गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा, ‘आईचा गोंधळ’, ‘कथा खंडोबाची’, ‘दोन बायकांची चाल पाडली देवानं’ ही त्यांच्या काही प्रसिद्ध अल्बमची नावं आहेत.

छगन चौगुले यांची प्रसिद्ध गाणी-

 

छगन चौगुले यांची प्रसिद्ध अंबाबाईची गाणी-

दत्तात्रय जन्म आणि कथा सती अनुसयाची हा अल्बम देखील फारच प्रसिद्ध होता-

छगन चौगुले यांची श्रावणबाळाची कथा प्रसिद्ध आहे-

महत्वाच्या बातम्या-

-निलेश राणे-रोहित पवार वादात जयंत पाटलांची उडी; रोहित पवारांना दिला हा सल्ला

-सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

-पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले? किती रुग्णांना मिळाला डिस्चार्ज???

-घरच्या अंगणाला रणांगण बनवणं याला शहाणपण म्हणत नाही; अजितदादा भडकले

-कोरोना परिस्थितीबाबत राज्यपालांनी बोलावली होती बैठक; मुख्यमंत्री जाणार नाहीत!