Loading...
देश

महात्मा गांधींचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळला; या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण

रांची | झारखंड येथील हजारीबाग येथे महात्मा गांधी यांचा पुतळा पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मात्र, हा पुतळा पडला की पाडण्यात आला याबाबत पोलीस तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

पुतळा स्व:ता पडला की कोणी त्याची तोडफोड केली याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. या प्रकरणी आम्ही सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहोत. काही लोकांची चौकशीही केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एनआयएने याबाबत ट्विट केलं आहे.

Loading...

8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे तुकडे झाले आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. गाधींचा हा पुतळा स्मारक म्हणून 2 फेब्रुवारी 1948 रोजी स्थापन करण्यात आला होता.

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची तक्रार गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज वर्मा यांनी दाखल केली ह आहे. पुतळ्याची तोडफोड झाली असेल तर ती करणाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-…तर राज ठाकरेंच्या मोर्चाला आमचा पाठिंबा असेल- राजू शेट्टी

-“केजरीवालांचा पराभव होणार, असं झालं नाही तर…”

-उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना मोक्का लावा- अजित पवार

Loading...

-मनसेनं कधीही हिंदुत्व सोडलेलं नव्हतं- शर्मिला ठाकरे

-राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाचा वसा घेतल्यामुळे शिवसेना अस्वस्थ- प्रवीण दरेकर

Loading...