महाराष्ट्र मुंबई

निवृत्तीनंतर महेद्रसिंह धोनी भाजपमध्ये नाही तर सैन्यात दाखल होणार???

MS Dhoni

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं माजी केंद्रिय मंत्री संजय पासवान यांनी सांगितलं होतं. 

धोनी निवृत्तीनंतर सैन्यात भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. धोनीने सियाचीनसारख्या कठीण ठिकाणी पोस्टींग मिळवून देशसेवा करण्याची इच्छा धोनीने व्यक्त केली असल्याचं धोनीच्या मित्राने सांगितलं आहे. 

धोनीच्या कामगिरीबाबत अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहेे. त्याने विश्वचषकात संथ गतीने फलंदाजी केली त्यामुळे त्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे, असा आरोही केला जात आहे.

धोनी काही दिवसात सियाचीनमधून पोस्टिंग मागू शकतो. सैन्यातील अधिकाऱ्यांना तो त्याची इच्छा कळवणार असल्याचं त्याच्या मित्राने सांगितलं आहे.   

दरम्यान, काही दिवसापूर्वीच धोनी निवृत्तीनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.