Loading...
महाराष्ट्र मुंबई

“चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी हरकत नाही”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानपर्यंत धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चासाठी पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी भाजप आमदार महेश लांडगे यांचं नाव असलेल्या बसचा वापर केल्याने भाजपचा मोर्चाला पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. यावर महेश लांडगे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

माझा वाहतुकीचा व्यवसााय आहे. मी कंपन्यांना बस पुरवत असतो. त्यामुळे माझी वाहनं हे कार्यकर्ते घेऊन गेले असतील. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत की नाही हे मला माहीत नाही. पण तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करत असल्यानं ते एका चांगल्याच कार्यक्रमाला गेले असल्याचं महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

Loading...

चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी त्याला हरकत नाही. त्या काही भाजपच्या गाड्या नाहीत. तो माझा वैयक्तिक व्यवसाय असल्याचं लांडगे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी, बांगलादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली 14 वर्ष मनसे कुठे होती?, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मनसेवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ मनसे कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंना नवी उपाधी

-मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक शिवस्मारकाचं काम थांबवलं; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

-“देशाच्या वैभवकाळाला आणि पतनाला हिंदूच जबाबदार आहे”

-…अन् लालकृष्ण अडवाणींना झाले अश्रू अनावर; पाहा व्हिडीओ

-शरद पवारांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा एैकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला

Loading...