Uncategorized

महाराज फक्त आवाज द्या…. ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो- महेश लांडगे

पुणे |  प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर गेली आठवडाभर टीकेची झोड उठली आहे. परंतू या सगळ्यांमध्ये त्यांची बाजू घेऊन बोलणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. अगदी महाराजांसाठी रस्त्यांवर उतरण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांनीही महाराजांच्या पाठीमागे आपण भक्कमपणेे उभं असल्याचं सांगितलं आहे.

इंदुरीकर महाराज आपण फक्त आवाज द्या… ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो, असं म्हणत त्यांनी एकीकडे महाराजांना समर्थन दर्शवलं आहे तर दुसरीकडे महाराजांवरच्या टीकाकारांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज इंदुरीकर महाराजांचं कीर्तन पिंपरी चिंचवड येथे पार पडलं. यावेळी महेश लांडगे समर्थकांनी तसंच महाराजांच्या चाहत्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

कीर्तनातून समाजपरिवर्तनाचा वसा घेतलेले वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर महाराजांच्या सोबत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर उभे आहे! महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू, अशी फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी महाराजांना आपलं समर्थन दर्शवलं आहे.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराजांचं वक्तव्य चुकीचं आहे पण एका चुकीसाठी माणूस वाईट होत नसतो. भाजप महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं पाटील म्हणाले आहेत. इंदुरीकर महाराजांनी मात्र त्यांच्या चाहत्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र लिहून मोर्चे, आंदोलने न काढण्याची विनंती केली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

तृप्ती देसाईंवर टीका करणाऱ्या इंदुरीकर भक्तांचा किशोरी शहाणेंनी घेतला खरपूस समाचार!

-ऐ भावा, इंदुरीकरांची कसली भारी हवा….. चाहत्यांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक!

-पुण्यातली ‘सविताभाभी’ सापडली… दुसरी तिसरी कुणी नाही, ती आहे सई ताम्हणकर!!

-माझ्यापेक्षा सोमय्या अन् भांडारींची चिंता केली असती तर बरं झालं असतं; सावंतांचा पलटवार

-‘गावासाठी जे मागाल ते सगळं देईन’!; तानाजी मालुसरेंच्या गावातून मुख्यमंत्र्यांची ग्वाही