दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना विरोध करणं हे तर भाजपच्या DNA मध्ये- मल्लिकार्जुन खरगे

मुंबई |  दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना विरोध करणं हे तर भाजपच्या DNA मध्ये आहे. त्याच मानसिकतेमधून त्यांनी आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर केली आहे. ते मुंबईत बोवत होते.

जरी आरक्षण संपवणं हे भाजपच्या डीएनएमध्ये असलं तरी काँग्रेस मात्र त्यांचा हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असंही खरगे यांनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे. काँग्रेस पक्ष भाजपशी दोन हात करायला किंबहुना संघर्ष करायला कोणताही विचार न करता मागे-पुढे पाहणार नसल्याचंही खरगे म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकार, अन्य राज्यांतील भाजप सरकारने तसंच उत्तराखंड भाजप सरकारने SC-ST-OBC यांच्या आरक्षणाच्या मुलभूत अधिकारावरच हल्ला केला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीला सरकारी नोकरीत आरक्षणाचा मूलभूत अधिकार नाही तसंच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची नाही, असं उत्तराखंड न्यायालयाने म्हटलं आहे. त्यावर उत्तराखंड भाजप सरकारची भूमिका ही आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरूवात असल्याचं खरगे म्हणाले.

दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना नोकऱ्या मिळू नयेत तसंच त्यांच्या नोकऱ्यांचा बॅकलॉग भरून निघू नये, यासाठी भाजप नेहमी प्रयत्नशील असतं, अशी टीका खरगे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भीमा कोरेगावचा तपास NIA कडे देऊन एक पाऊल मागे घेतलेलं ठाकरे सरकार मोदींना ‘असा’ देणार शह?

-रामलीला मैदानावर आज आवाज घुमणार, मैं अरविंद केजरीवाल…..शपथ लेता हूँ की

-पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवली जाणं चुकीचं आणि दुर्दैवी- सुप्रिया सुळे

-मुलींनी प्रेम करु नये हे समाजाने का ठरवावे… त्यांच्या भावनांचं काय??- सुप्रिया सुळे

-भाजप नेत्याने पुष्पहार घातला म्हणून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचं केलं गंगाजलाने शुद्धीकरण!