Loading...
महाराष्ट्र मुंबई

मी महाराष्ट्राची लेकय; घाबरणारही नाही आणि गप्पही बसणार नाही- मानसी नाईक

मुंबई | अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी घाबरणार नाही, मी गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया मानसी नाईकने दिली आहे.

हे प्रकरण माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत मी काहीही बोलले नाही. मात्र, माझ्या आईला धमकविण्याचा प्रयत्न झाला आहे. आज महिलांबाबत अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी पुढे आले पाहिजे, असं मानसीने म्हटलं आहे.

Loading...

पुण्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगावमध्ये पुण्याचा युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्तानं मानसी गेली होती. या कार्यक्रमात परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केलं.

दरम्यान, याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मुख्यमंत्रीसाहेब, तुम्हाला लाज वाटायला हवी- राजू शेट्टी

-मनसेत प्रवेश करताच जाधवांची गर्जना; ‘आता चंद्रकांत खैरे खासदार होणे नाही…!’

-दिल्लीचा गड आम्हीच जिंकणार; भाजपच्या मनोज तिवारींचा दावा!

-साहेब, हेल्मेट तुटलंय, पैसे संपलेत मला पकडू नका; पुणे पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर

-झेंडा आणि अजेंडा बदलताच राज ठाकरेंचा जुना भिडू पक्षात परत!

Loading...