Loading...
देश

दिल्लीत केजरीवालांची हॅट्रीक होणार…. पण ‘आप’ला सगळ्यात मोठा धक्का बसणार?

नवी दिल्ली |  दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिली आहे. 70 जागांपैकी 57 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. आपसाठी हे खूप चांगलं चित्र आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पिछाडीवर आहेत.

सिसोदीया त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात मतांसाठी झगडताना दिसत आहेत. पक्षासाठी ही मोठी चिंतेची गोष्ट आहे. किंबहुना पक्षाला ही गोष्ट धक्कादायक असल्याचं बोललं जातंय.

Loading...

भाजपच्या रविंद्र सिंग नेगी यांचं कडवं आव्हान सिसोदिया यांच्यासमोर आहे. सहा राऊंडनंतर 2182 मतांनी सिसोदिया  पिछाडीवर आहेत.

दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक खात्यांचा भार सिसोदियांकडे होता. सिसोदिया पराभूत झाल्यास पर्यायी चेहरा कोण?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘आप’ला बहुमत; केजरीवालांच्या विकासापुढे महाराष्ट्र भाजपचे नेतेही काही करू शकले नाहीत!

-दिल्लीत भाजपचा पराभव दिसू लागताच शिवसेनेची सडकून टीका तर ‘आप’वर स्तुतीसुमनं!

-दिल्लीत पैसा हरला… केजरीवालांचा विकास जिंकला- नवाब मलिक

-दिल्लीत ‘आप’ची जोरदार आघाडी; पाहा कोण किती जागांवर आघाडीवर

-दिल्लीमध्ये काहीही होऊ…. मी जबाबदार- मनोज तिवारी

Loading...