Loading...
महाराष्ट्र मुंबई

“मनसेच्या मोर्चामागे भाजपचाच हात”

मुंबई | पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनविरोधात यासाठी मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं आहे. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मनसेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेनेला कोणताही फटका बसणार नाही. तसेच मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात आहे, असा आरोप मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Loading...

मनसेच्या मोर्चामुळे आमचं काहीही नुकसान होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचेच मुद्दे मनसे पुढे घेऊन जात आहे, पाकिस्तानी, बांग्लादेशी हे मुद्दे आत्ताच का आठवले? गेली 14 वर्ष मनसे कुठे होती?, असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपला कधीच महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येत नाही. त्यांना दुसऱ्या पक्षाच्या कुबड्या कायम लागतात, अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-राज ठाकरेंवरील प्रेमापोटी दिव्यांग आजोबांनी नगरहून थेट गाठली मुंबई!

-“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही”

-“थोड्या दिवसांनी अजित पवारच शिवसेना चालवताना दिसतील”

-मी नाराज नाही; मी माझे मुद्दे मुख्यमंत्र्याकडे मांडले आहेत- तानाजी सावंत

-हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत

Loading...