एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?

नवी दिल्ली | राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने नियम न पाळणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. मास्कचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र काही लोक या नियमांचं पालन न करताना आढळून येत आहे. अशात मास्क न घालणारांविरोधात कडक मोहिम राबवली जात आहे. मात्र या विरोधात तक्रारीचा सूर निघत आहे.

मास्कची कारवाई करताना एकट्या वाहनचालकांना पकडून त्याच्याकडून दंड आकारला जात आहे. यावर नागरिकांची तीव्र नाराजी असून एकट्या वाहनचालकाला दंड का?, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भातच विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यानं महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.

एकट्याने सायकल किंवा गाडी चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे का?, असा प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना विचारला गेला होता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे. एकट्याने गाडी किंवा सायकल चालवताना मास्क घालण्यासंदर्भात केंद्र सरकारने कोणतीही मार्गदर्शक सूचना जाहीर केलेली नाही, असं भूषण यांनी म्हटलं आहे.

शारीरिक चालचाली करण्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे. काही नागरिक गटागटाने सायकलिंग किंवा जॉगिंग करताना दिसतात. अशा परिस्थितीत काही लोक एकत्र येतात, अशावेळी मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मास्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा प्रकरणांवर पोलिसांनी कटाक्षाने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. देशभरात यासंदर्भातील कारवाईला मोठा वेग आला आहे. महाराष्ट्रातही पोलीस अशा प्रकारची कारवाई मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहे.

दरम्यान, गाडी चालक एकटा असला तरी त्याला पोलिसांकडून पकडलं जात आहे. तसेच त्याला मास्क न घातल्याप्रकरणी दंड आकारला जात आहे. नागरिकांनी या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. यासंदर्भात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आधी बेड मिळाला नाही, नंतर पार्थिवाची हेळसांड; पुण्याच्या माजी महापौराचा दुर्दैवी शेवट!

“सुशांतप्रकरणी भाजपचं तोंड काळं होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे”

सुशांतसिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; सुशांतच्या कुटुंबाच्या वकिलाचा नवा धक्कादायक दावा

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! 13 दिवसांच्या तपासानंतर अखेर सीबीआयचा महत्वाचा निष्कर्ष

दहावी-बारावीच्या ATKT च्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला मोठा निर्णय