देश

पाकमध्ये हिंदूवर होणाऱ्या हल्ल्याचा अमेरिकेने नोंदवला निषेध

नवी दिल्ली |  पाकमधील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करत नसल्याबद्दल अमेरिकेने पाकिस्तानचा निषेध केला आहे. 27 देशांच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानात हिंदूंबरोबर होत असलेल्या छळाचाही उल्लेख केला.

इराकमध्ये याझिदी, पाकिस्तानात हिंदू, बर्मामध्ये मुस्लिम आणि नायजेरियात ख्रिश्चन अशा धार्मिक अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी, कट्टरपंथीयांचा आम्ही निषेध करतो, असं पॉम्पिओ म्हणाले.

पाकिस्तानात हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. लग्नासाठी हिंदू मुलींचे जबरदस्ती धर्मांतर होत असल्याची प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांचे हे विधान महत्वाचं आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, युनायटेड किंगडम, इस्रायल, युक्रेन, नेदरलँड आणि ग्रीस हे प्रमुख देश आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेचे सदस्य आहेत. अल्पसंख्यांकाच्या हक्काचे रक्षण करणं, हा या परिषदेचे प्रमुख उद्देश असेल असंही पॉम्पिओ यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाचं अक्षर पाहून जयंत पाटील भारावले; केलं तोंडभरून कौतुक

-भाजप वैचारिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळले नाहीत- जयंत पाटील

-मायाळू मंत्री बच्चू कडूंनी ‘राहुटी’त ऐकल्या चिमुकल्याच्या मागण्या!

-“चंद्रकांतदादा, मध्यावधी निवडणूक लागली तर तुम्ही कुठून लढणार पुणे की कोल्हापूर??”

-आरोपीने जसा गुन्हा केलाय तशीच शिक्षा त्याला व्हायला हवी- रूपाली चाकणकर