“MIM हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे”

पुणे |  आम्ही १५ कोटी आहोत मात्र १०० कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वादग्रस्त वक्तव्य करत देशातल्या हिंदुंना धमकी देण्याचा प्रयत्न एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारीस पठाण यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापलं आहे. चोहोबाजुंनी त्यांच्यावर आणि एमआयएमवर टीकेची झोड उठली आहे. यावरच MIM हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे, असं सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमात बोलत होते.

स्वातंत्र्योत्तर भारतात जे धर्माच्या आधारावर द्वेष करणारे गट भारतात होते त्यामध्ये एमआयएम हा मोठा गट होता. 6 पिढ्या निजामाचं अगदी सुरळीत चाललं होतं. राजा अल्पसंख्याक आणि प्रजा बहुसंख्याक हिंदू तरीदेखील निजामाचं व्यवस्थित चाललं होतं. निजामाच्या काळात मराठवाड्यात फार धार्मिक क्लेश दिसत नाहीत उलट मराठवाड्यात मंदिरांचे जिर्णोद्धार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कासिम रझवीचं कनेक्शन थेट मोहम्मद अली जिनांशी होतं. त्यांना असं वाटत होतं की धर्माच्या आधारावर राज्य होऊ शकतं आणि आजही एमआयएम याच आशेवर जगतोय की भारताची अजून एक फाळणी होऊ शकते, असं चौधरी म्हणाले.

एमआयएम हा मोठा जातीय विखार आहे. त्यामुळे हा जर विखार लवकर संपला नाही तर पुढे काय होऊ शकते याची कल्पना नाही. कासिम रझवीने ओवैसींच्या आजोबाला पक्ष दिला. कासिम रझवीला कम्पलसरी पंडित नेहरू आणि सरदार पटेलांनी पाकिस्तानात जायला लावलं. त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले एकतर भारतात कायम जेलमध्ये रहा नाहीतर पाकिस्तानात जा आणि त्यांनी पाकिस्तानात जायचा पर्याय निवडला. संविधान आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आहे हे एमआयएम विरसला आहे त्यामुळे ते अधून-मधून अशी वादग्रस्त वक्तव्यं करतात, असंही चौधरी म्हणाले.

एमआयएम मराठवाड्यात घुसली जी एमआयएम मराठवाड्यात नव्हती.  आपल्या मराठवाड्याचे नतद्रष्टे राजकारणी ज्यांना फक्त जातीय ध्रुवीकरण करायचं आहे त्यांच्यामुळे एमआयएम पहिल्यांदा नांदेडमध्ये घुसली आणि त्यानंतर ती पुढे पसरत गेली. तरीदेखील एमआयएमला मोठा आधार नाही. एमआयएम हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे, असंही चौधरी म्हणाले.

रझाकारांच्या नादाला लागून जे मुस्लिम त्यांना मतदान करतात तेवढं मतदान त्यांना होतं. एमआयएम आणि रझाकारांकडे विचारच नव्हता तर त्यांना फक्त धर्माच्या आधारावर मांडणी करायची होती. त्यांना फक्त जात्यांत्य, धर्मांध मुसलमानांची राजवट एवढाच त्यांच्या डोक्यात विचार होता, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही वाहून जाल- मनसे

-अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जागा द्या, नाहीतर…- रामदास आठवले

-वारिस पठाणांच्या भडकाऊ भाषणाला ‘आम्ही भारताचे लोक’ राज्यघटनेने उत्तर देणार- आव्हाड

-उदयनराजेंच्या खासदारकीला संजय काकडेंचा आक्षेप; म्हणाले, उदयनराजेंचं योगदान काय??

-….म्हणून आता 12 वी चे विद्यार्थी नापास होणार नाहीत!