Top news पुणे महाराष्ट्र

नारीला सलाम…. प्रथम कोरोना तपासणीचं किट बनवलं अन् नंतर बाळाला जन्म दिला!

पुणे |  माय लॅबच्या टीममध्ये काम करणाऱ्या पुण्याच्या मिनल भोसले यांचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. 9 महिन्यांची गर्भवती असताना देखील त्यांनी कोरोना तपासणीचं किट पूर्ण करण्याचे काम केलं. नुकताच त्यांनी एका गोड बाळाला जन्म दिला आहे .

कोरोनाच्या तपासणीसाठी आता मेड इन इंडिया किट्स तयार झाली आहेत. पुण्याच्या ‘माय लॅबनं’ आधीच संशोधन सुरू केलं आणि अवघ्या सहा आठवड्यांतं मेड इन इंडिया किट तयार केलं. हे किट आता बाजारात उपलब्ध आहे.

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हीच वाढणारी रूग्णांची संख्या लक्षात घेता सॅम्पल्स टेस्ट कीट कमी पडत आहेत. त्यावर पुण्यातल्या ‘माय लॅब’ डिस्कवरी सोल्युशन्स कंपनीनं संशोधन करुन मेड इन इंडिया टेस्ट किट विकसित केलं आहे.

मिनल भोसले याच टीममध्ये काम करत आहेत. या कंपनीत त्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख आहेत. हे किट तयार होण्यासाठी चार महिन्यांचा वेळ लागणार होता. मिनल यांच्या डिलीव्हरीची तारीख देखील जवळ येत होती. त्यांनी जोमाने काम करत अवघ्या सहा आठवड्यात हे किट तयार केलं.

महत्वाच्या बातम्या –

-‘पोटासाठी नाचते’ म्हणणाऱ्या नृत्यांगणांवर उपासमारीची वेळ; मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची विनंती

-“केंद्र सरकारनं ‘रामायण’ सुरु केलं, तसं राज्य सरकारनं ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सुरु करावी”

-गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण? पाहा काय आहे सत्य…

-विदेशी खेळाडूंची भरघोस मदत… कोहलीची 688 कोटीची संपत्ती मात्र मदतीचा हात आखडता!

-उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत खाकी वर्दीवर हात; अजित पवार काय कारवाई करणार याकडे लक्ष