पुणे महाराष्ट्र

भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल- महेश लांडगे

पुणे |  भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल, असं भोसरी विधानसभेचे आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. फेसबुक पोस्ट करून काळजीचं कारण नाही. लवकरच मी कोरोनावर मात करेन, असा विश्वास महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

भोसरी विधानसभेचे आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजींनी महेश लांडगे यांनी लवकरात लवकर कोरोनावर मात करून ठणठणीत बरं व्हावं, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या फेसबुक पोस्टला लांगडे यांनी रिप्लाय केला आहे.

गेली दोन ते तीन महिने कोरोना महामारीत स्वतःला झोकुन देऊन पूर्ण भोसरी मतदार संघाला स्वतःचं कुटुंब समजून जनतेची दिवसरात्र सेवा करण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या महेशदादा लांडगे यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याची माहिती मिळाली. मतदार संघातील मोठं मोठ्या समस्यांना पुरून उरणारे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे कोरोनावरही लवकरचं मात करतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे, अशा भावना आपल्या फेसबुक पोस्टमधून संभाजी भिडे यांनी व्यक्त केल्या होत्या.

दरम्यान, महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झालाआहे. त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणाऱ्या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”

-काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

-इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभरात आंदोलन सुरु

-विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

-…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस