आरोग्य कोरोना पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोनाची लागण

पिंपरी | भोसरी विधानसभेचे आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांचा मतदार संघातील लोकांशी संपर्क आला होता. तसेच शहरात येणाऱ्या प्रदेश पातळीवरील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड कोरोनाचा केंद्रबिंदू बनलं आहे. पिंपरी चिंचवड येथे दररोज १५० ते २०० च्या आसपास कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बैठकिला आमदार महेश लांडगे हे देखील उपस्थित होते. त्यांनी मतदार संघातील कोरोनाच्या परिस्थितीवर मान्यवरांसोबत चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या बैठकिला ते उपस्थित होते. यावेळी त्यांचा अनेक नेत्यांशी संपर्क आला आहे.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयात प्रशासनाकडून कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी आमदार महेश लांडगे फडणवीस यांच्यासोबत बराच वेळ होते. फडणवीस यांच्यासोबत आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा संपर्क आला होता. तसेच, मतदार संघातील ब-याच ठिकाणी हायअलर्ट करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी उलटली; एक्स्प्रेस वेवर अपघात

-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

-राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती

-वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं