Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देखील आमदार नाही” वक्तव्यावर मनसेचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

Raj Thackeray and Sharad Pawar

मुंबई | शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय हवा दुषीत झाली आहे. शिवसेना आणि शिंदे यांच्या गटाचे वाद सर्वश्रुत आहेतच.

आता मनसे (MNS) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेना संपविण्याची सुपारी घेतल्याचे आरोप केले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संहिता (Script) वाचतात. दसरा मेळाव्याची संहिता (Script) देखील बारामतीवरुनच येणार आहे, असे मनसेचे एक पदाधिकारी म्हणाले होते.

तसेच शिवसेनेच्या मंचावर शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर पोचली आहेच. पण आता इम्तियाज जलिल आणि असदुद्दीन ओवेसी देखील येणार का, असा प्रश्न मनसेकडून विचारण्यात आला होता.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: उत्तर दिले होते. हाताच्या बोटावर मोजण्यायेवढे सुद्धा आमदार आणि लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची क्षमता नसणाऱ्या पक्षाबद्दल मी काही बोलणार नाही, असे पवार म्हणाले.

मनसेचे एकमेव निष्ठावंत आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी पक्षाच्या वतीने उत्तर दिले आहे. आज बोटे मोजत आहात. उद्या बोटे मोडाल आणि परवा बोटे तोंडात घालाल, असे पाटील म्हणाले.

तसेच आम्ही धनसे कमी आहोत पण मनसे लई आहोत, असे देखील पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी संधी सर्वांना मिळते आणि शरद पवारांना आदर देतोय आदर घ्या, असे देखील सुनावले.

महत्वाच्या बातम्या – 

‘मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेची नवी खेळी’

रामदास कदमांच्या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर संतापल्या; म्हणाल्या, तुमच्या बापाच्या…

दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेला मोठा दणका देण्याचा एकनाथ शिंदेंचा डाव

लालबागचा राजा सार्वजनिक गणेसोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेचा साडेतीन लाख दंड; कारण त्यांनी…

पत्राचाळ घोटाळ्यात आपला सहभाग आहे का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर