Loading...
मुंबई

“थोड्या दिवसांनी अजित पवारच शिवसेना चालवताना दिसतील”

मुंबई | ज्यांचं सरकार अजित पवार चालवतात त्यांनी आम्हाला शिकवू नये. मुख्यमंत्र्याकडे गर्दी होत नाही तेवढी अजितदादांकडे असते, असं म्हणत मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनविरोधात मनसेकडून गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन केलं आहे. यावरून शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या याच टीकेचा अविनाश जाधव यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

Loading...

थोड्या दिवसाने अजित पवारच शिवसेना चालवतील. सत्तेसाठी शिवसेनेनं जी चूक केली आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम झाली, असा टोला संदिप देशपांडे यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-मी नाराज नाही; मी माझे मुद्दे मुख्यमंत्र्याकडे मांडले आहेत- तानाजी सावंत

-हिंदूस्थानची अवस्था पाकिस्तानसारखी झाली नाही, ते फक्त गांधी, नेहरु आणि पटेलांमुळेच- संजय राऊत

-महात्मा गांधींच्या तोडीचा नेता स्वातंत्र्य चळवळीत झाला नाही म्हणूनच…- संजय राऊत

-“चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल तर माझी हरकत नाही”

-‘हिंदूहृदयसम्राटांचा छावा’ मनसे कार्यकर्त्याकडून राज ठाकरेंना नवी उपाधी

Loading...