Loading...
महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्रीसाहेब, प्रथम स्वत:च्या अंगणातील घुसखोरांना हाकला; मनसेचं आव्हान

मुंबई | मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मनसेनं पोस्टरबाजी केली आहे. यात मनसेनं थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं असून वांद्र्याच्या अंगणातील पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकला, असं म्हटलं आहे. मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी हे पोस्टर लावले आहेत.

माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदूस्थानातून हाकलंलच पाहिजे, हीच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा, असं मनसेनं पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

Loading...

वांद्र्यात जे पोस्टर केले आहेत त्यामध्ये कोणतेही आवाहन नसून विनंती केली आहे. बांगलादेशींना हाकला हा मुद्दा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे आणला होता. पण राज ठाकरे हा मुद्दा आता रेटून नेत आहेत, असं चित्रे म्हणाले आहेत.

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर हाकलण्याच्या मुद्द्यावरुन मनसे मोर्चा काढणार आहे. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-खळबळजनक! सांगलीत आठवड्याभरात 2 राष्ट्रवादी नेत्यांच्या हत्या

-“एक केजरीवाल सगळ्यांना भारी पडतायत; मागच्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांवर मतं मागितली”

-पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींना ‘ट्युबलाईट’ची उपमा!

-आपल्यातील भांडणं विसरुन कठोर निर्णय घ्या; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

-पीडितेला भेटायला जाताना यशोमती ठाकूरांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी

Loading...