तारक मेहताच मराठीचे ‘मारक’ मेहता; मनसेचं टीकास्र

मुंबई |  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील गोकुलधाम सोसायटीतील किस्से संपता संपत नाहीत. सध्या मालिकेतील चालू असलेल्या भागांमध्ये गोकुलधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी भिडताना दिसले. मात्र यावर मनसेचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

मालिेकेमध्ये काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते, असं म्हणत मालिकेतील मराठी कलाकारांवर खोपकर यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान, ‘आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या भागामध्ये बोलताना दिसत आहेत. यावरूनच खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सोडून काँग्रेसचा हात, हार्दिक पटेल देणार का केजरीवालांना साथ?

-ज्यांना शक्य आहे, त्यांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी या; देवदर्शनात राजकारण करू नका- उद्धव ठाकरे

-“सामनातील भाषा आपली पितृभाषा आहे; ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही”

-संजय राऊत आमच्या घरचा माणूस, तर नरेंद्र मोदी मोठे बंधू- उध्दव ठाकरे

-विद्याताईंची राजकीय प्रतिमा खराब व्हावी म्हणून या भानगडी होतायेत- रूपाली चाकणकर