ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तसं करणार नाही, भाजपने हा वाद सुरू केला; मनसेकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्येवरून  मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप केले जात आहेत. भाजप नेते नारायण राणेंनी उघडपणे आदित्य ठाकरेंलवर आरोप केला. मात्र मनसेकडून आदित्य ठाकरेंची पाठराखण करण्यात आली आहे.

ठाकरे परिवाराच्या एखाद्या सदस्याकडून अशाप्रकारची गोष्ट झाली असेल, असं वाटत नाही. भाजपच्या आरोपांमुळेच हा वाद सुरु झाला, असं एकनिष्ठ मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

बाळा नांदगावकरांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हे स्पष्ट होतं की मनसेचं आदित्य ठाकरेंना समर्थ आहे. आदित्य ठाकरेंनी मागे आपली प्रतिक्रिया दिल्यावर त्यांच्या स्पष्टीकरणावरही विरोधकांनी आक्षेप घेतला होता.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच, ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोळी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा असल्याचं आदित्य ठाकरेंनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“सुशांतच्या मृत्युवरून पत्रकार परिषद घेणाऱ्या राणेंनी मात्र आपला भाऊ अंकुश राणेंच्या हत्येबाबत ब्रही नाही”