Loading...
औरंगाबाद महाराष्ट्र

मनसेच्या शॅडो कॅबीनेटच्या घोषणेदिवशीच या मनसे नेत्याला होणार अटक?

औरंगाबाद |  नुकतीच मनसेमध्ये घरवापसी केलेल्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अ‌ॅट्रॉसिटी प्रकरणात औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अ‌ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधवांवर आहे.

Loading...

हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी एक टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी टपरी मालकाला जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीनं केला आहे.

दरम्यान, नेमकं कोणत्या कारणासाठी गुन्हा दाखल झाला आहे याची मला माहिती नाही. मात्र, शिवसेनेनं औरंगाबादच्या नामांतरावरुन जे राजकारण केलं, त्यासंदर्भात मी जी भूमिका जाहीर केली होती. त्यामुळेच सेनेनं माझ्याविरोधात षडयंत्र केलं आहे, असा आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर सुटका करा’; पवारांचं सरकारला पत्र

-“शॅडो कॅबिनेटचा निर्णय अशा शॅडो पक्षाने घेतलाय जो 14 वर्ष कधीही प्रकाशात आला नाही”

-चिकन खाल्याने कोरोना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका – आरोग्यमंत्री राजेश टोपे

-10×10 च्या खोलीत बालपण घालवलेल्या नेहा कक्करने खरेदी केला आलिशान बंगला!

-कोरोनामुळे औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला; इम्तियाज जलील यांची मागणी

Loading...