असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

पुणे | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या परीक्षेऐवजी श्रेणीच्या निर्णयाला प्रलंबित ठेवत विद्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली आहे. यावरून मनसे नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

तुम्ही असाल सर्वेसर्वा पण विद्यार्थीच्या आरोग्य आणि भवितव्य याचा चांगला योग्य विचार झाला पाहिजे, असं म्हणत रूपाली पाटील यांनी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध केला आहे.

आता राज्यपाल यांनी भाज्यपालचा खेळ नका खेळू, असा टोला रूपाली पाटील यांनी भगतसिंह कोश्यारींना लगावला आहे. तसेच विद्यार्थी हे आपल्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे हे विसरू नका महोदय राज्यपालसाहेब, असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घेण्यात येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय कळवलं आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या निर्णयाला सध्या प्रलंबित ठेवलं आहे. राज्य सरकारला विद्यापीठ कायद्याची आठवण करुन दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-निसर्ग चक्रीवादळ धडकण्यापूर्वी पावसाचा तडाखा, पाहा कुठे कुठे आहे पावसाचा जोर?

-राज्यपालांनी सरकारचा ‘तो’ आदेश फिरवला, आता नवा वाद सुरु

-‘डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप’ कार्यक्रमाची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून घोषणा

-पुण्यात आज 169 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

-राज्यात कोरोनामुक्त पोलिसांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 35 पोलिसांना डिस्चार्ज