Loading...
महाराष्ट्र मुंबई

अस्तनीतले निखारे विझवायलाच हवेत; मनसेचा एल्गार!

मुंबई | अजेंडा आणि झेंडा बदलल्यानंतर मनसेने आपला कार्यक्रम कृतीत उतरवण्यासाठी 9 तारखेला पाकिस्तानी आणि बांगलादेशी धुसखोरांविरोधात मोठा मोर्चा काढण्याचं ठरवलं आहे. त्याचीच तयारी मनसे कार्यकर्ते आणि नेते मोठ्या जोमात करत आहेत. सोशल मीडियावर मोर्चाचा अधिकाधिक प्रचार करण्याचा प्रयत्न मनसे करत आहे. आज ट्वीट करत अस्तनीतले निखारे विझवायलाच हवेत, असं म्हणत मनसेने घुसखोरांविरोधात एल्गार पुकारला आहे.

मुंबई विमानतळावर ‘लष्कर ए तोयबा’च्या एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. याच वृत्ताचा हवाला देत मनसेने अस्तनीतले निखारे विझवायलाच हवेत, असं ट्वीट केलंय.

Loading...

मुंबईच्या गल्लोगल्लीत सध्या मनसेच्या मोर्चाचा प्रचार करणाऱ्या गाड्या फिरत आहेत. मुस्लिम बहुल भागांमधूनही या गाड्या जात आहेत. ‘पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना मनसेचा निर्वाणीचा इशारा… लवकरात लवकर आपल्या देशात सुखरूप जा’ अशा आशयाचे फ्लेक्स सध्या मुंबईत लागले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रभरातून मनसे कार्यकर्ते 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत येणार आहेत. बदललेल्या विचारधारेसह राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला आम्ही उत्सुक आहोत, असं मनसैनिकांनी सांगितलं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-हिंगणघाट पीडितेचा संपूर्ण खर्च मी उचलतो; उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

-आम्ही ऑपरेशन करणार नाही, तर लवकरच सरकारचं सीजर होईल; बबनराव लोणीकरांचं टीकास्त्र

Loading...

-देशात बेरोजगारी एवढी वाढलीय की देशातील तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाठ्यांनी मारतील- राहुल गांधी

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

-शिवसेनेने माझ्या आमदारकीचा राजीनामा घेतला, तर मी शिपाई म्हणून काम करेन- तानाजी सावंत

Loading...