दिल्लीतील बहुतांश रूग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येतंय. राजधानी दिल्लीतही रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. मात्र दिल्लीतील अनेक लोकांना कोरोनाबाबतची सूक्ष्म लक्षणं दिसतायत त्यामुळे या परिस्थितीत रूग्ण घरीच बरा होत असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या वाढली असल्याने असल्यानंच कोरोनाबाधितांची संख्याही वाढतेय. यापूर्वी दररोज 5-6 हजार चाचण्या होत होत्या पण आता 18-20 हजार चाचण्या होतायत. चाचण्या कमी होत असताना 2 हजार रूग्णांची नोंद व्हायची तर आता चाचण्या वाढवल्यावर तीन ते साडेतीन हजार रूग्णच समोर येतायत.

सध्या रुग्णालयात बेड्स उपलब्ध असून नवीन नोंद होणाऱ्या रुग्णांसाठी 13 हजार बेड्स तयार आहेत. तसंच रुग्णांवर प्लाझमा थेरेपीनं उपचार करण्याची परवानगीही मिळाल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं.

दिल्लीतील एकूण रूग्णांपैकी 45 हजार रूग्ण बरे झालेत. शिवाय दिल्लीत सध्या 26 हजार कोरोना रूग्ण असून त्यापैकी केवळ 6 हजार रूग्ण रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित हे त्यांच्या घरीच उपचार घेत असल्याची माहिती आहे.

 

-पंकजा ताईने दवाखान्यात असताना फोन केला, मला खूप आनंद झाला- धनंजय मुंडे

-गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…