देशाच्या राजकारणावर पसरली शोककळा ‘या’ खासदाराचे निधन

दिल्ली | देशाच्या राजकारणावर आता पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. राज्यसभेचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांचे आज निधन झाले आहे.

अमरसिंग गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. सिंगापूरमधील ‘माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटल’ येथे गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. मात्र आज अखेर नियतीने त्यांच्यावर घाला घातला व सिंगापूर मधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.

अमरसिंग कित्येक वर्षे समाजवादी पक्षात महत्वाची भूमिका बजावत होते. त्यांनी समाजवादी पक्षाचे महासचिव म्हणून ही काम पाहिलं होतं. मात्र, पक्षात झालेल्या मतभेदांमुळे ते पक्षातून बाहेर पडले. नंतर भाजपशी जवळीक साधत त्यांनी मोदींना आपला पाठिंबा दिला.

दरम्यान, अमरसिंग यांचे बॉलीवूडशी घनिष्ट संबंध होते. बॉलीवूडमुळे ते अनेकदा अडचणीतही आले होते. अभिनेत्री जया बच्चन आणि जया प्रदा यांना अमरसिंग यांच्यामुळेच समाजवादी पक्षाकडून खासदारकी मिळाल्याचं बोललं जात होतं.

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येच्या रात्री सुशांतसोबत असणाऱ्या मित्राने सांगितली ‘त्या’ रात्रीची कहानी; म्हणाला…

…त्यामुळे सदाभाऊ पिसाळल्यासारखं करत आहेत; राजू शेट्टींचं जोरदार प्रत्युत्तर!

‘राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू’; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

आनंदची यशोगाथा! ज्या इयत्तेत झाला होता नापास त्याच इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात आज त्याचा धडा

जन्मदात्याचं ‘ते’ वाक्य जिव्हारी लागल्याने आठवीत शिकणाऱ्या मुलीने संपवलं आपलं आयुष्य!