Top news खेळ देश

आयपीएलच्या पुढील हंगामात चैन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा धोनीच

dhoni csk ipl
Photo Credit - Twitter / @ChennaiIPL

मुंबई | अनेक क्रिकेट प्रेमींच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारा महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधील शेवटचा सामना कधी खेळणार हे स्पष्ट केलं आहे. जगातील एक महान आणि यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची ओळख आहे. आयपीएलमधील चैन्नई सुपर किंग्जचे यशस्वी नेतृत्व महेंद्रसिंग धोनीने केलं आहे.

एमएस धोनी आयपीएलच्या पुढील हंगामात देखील चैन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद भूषवणार आहे. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने चैन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत चारवेळा आयपीलमध्ये जेतेपद मिळवून दिलं आहे.

पुढील वर्षात खेळणार का?, असा प्रश्न महेंद्रसिंग धोनीला विचारण्यात आला होता. मी पुढील हंगामात नक्कीच खेळणार आहे. चैन्नई सुपर किंग्जचे आभार मानणे अनुचित होईल, असं धोनीने म्हटलं आहे.

सीएसकेच्या चाहत्यांसाठी मला असे करणे योग्य वाटत नाही. मी चैन्नईमध्ये खेळत नाही हे चाहत्यांना आवडणार नाही, असंही धोनीनं म्हटलं आहे.

पुढील हंगामात संघाला वेगवेगळ्या शहरामध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी चाहत्यांना धन्यवाद म्हणण्याची संधी मिळेल, असं महेंद्रसिंग धोनीने म्हटलं आहे.

मला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. हे सर्वांचे आभार मानण्यासारखे होईल. पुढील वर्ष हे माझे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असेल, असं म्हणणं हे घाईचं ठरेल, असं एमएस धोनीने स्पष्ट केलं आहे.

पुढील दोन वर्षातील भविष्यवाणी आपण करू शकत नाही हे आपण जाणता. परंतु, मी निश्चितच पुढच्या वर्षात दमदार पुनरागमन करण्यासाठी मेहनत करेल, असं महेंद्रसिंग धोनीने म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्त्व करतो. एमएस धोनीने सीएसके संघाला एक ओळख मिळवून दिलेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘त्यांची सुपारी फुटली नसेल म्हणून आता…’; मनसेचा घणाघात

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘नवरात्री आणि मांसाहार…’; सोनू निगमच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार

‘नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनियम सुरू’; राष्ट्रवादीचा मनसेला जोरदार टोला