मुंबई | विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
आजच्या निवडणुकीत एका आमदाराच्या मताला महत्व आहे. यासाठीच मतं गोळा करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) दोन्ही गोटात जोरदार हालचाली सुरू आहेत.
मागील काही दिवसांपासून आजाराने त्रस्त असणाऱ्या पुण्याच्या भाजप आमदार मुक्ता टिळक मतदान करण्यासाठी पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
पक्षाला आपली गरज आहे. तसेच पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात असल्यामुळे आपण मतदानासाठी जात असल्याचे मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काल भाजप आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. निवडणूक कठीण आहे पण विजय अशक्य नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
“तोडफोडीमध्ये सहभागी झालेल्यांना सैन्य दलात घेणार नाही”
“काही खोटारडी लोकं मनाला वाटेल तसं बोलत असतात”
“आज तीच शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली आहे”
“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची सशक्ततेच्या दिशेने वाटचाल”