महाराष्ट्र मुंबई

हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा

high court

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि. ने  ही  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”

-“नक्की नियंत्रणात काय, कोरोनाची स्थिती का आमदारकी?”

-“शाहू राजांनी तोफा वितळवून नांगर बनवले आणि महाराष्ट्राने फडणवीसांचा माज उतरवून भंगार बनवलं”

-राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी  एसटी सेवा देणार- विजय वडेट्टिवार

-’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल