Top news आरोग्य कोरोना

मुंबईवरुन लपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; पारनेरचे 200 जण क्वारंटाईन

अहमदनगर | लॉकडाऊन असताना देखील मुंबईहून लपून-छपून आलेल्या अतिउत्साही जावयाने पारनेर तालुक्याची झोप उडवली आहे. जावयाला कोरोना झाल्याचं मृत्यूनंतर उघड झाल्याने दोनशे जणांवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची आणि मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण बरे होत आहेत, तर काही जणांना प्राण गमवावे लागत आहेत. मात्र अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत आहे.

पारनेरच्या पिंपरी जलसेन या गावात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. लपून-छपून आलेल्या मुंबईच्या अतिउत्साही जावयाने साऱ्या गावाला भेट दिली. या जावयाने मुंबईतील घाटकोपर ते पारनेर असा प्रवास केला होता. त्यानंतर सासुरवाडीला म्हणजे पिंपरी जलसेनपर्यंत जाऊन त्याने नातेवाईकांच्या भेटीगाठी घेतल्या.

मृत्यूनंतर जावयाला ‘कोरोना’ असल्याचं समजलं.  मृत जावयाच्या थेट संपर्कात आलेले आणि संपर्कात आलेल्यांच्या संपर्कातील किंवा माहितीतील किमान 200 जण संशयित रुग्ण झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-दारु पाजून महसूल मिळवण्यापेक्षा देवस्थानांचं सोनं सरकारनं व्याजानं घ्यावं- तृप्ती देसाई

-पंतप्रधान किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले नसतील तर अशी करा तक्रार…

-सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने रचला नवा इतिहास, 47 कोटीच्या वर हिट्स

-बिल गेट्स यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार, कारण…

-अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला भरीव पॅकेज द्या; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र