रक्षाबंधन दोन दिवसांवर असताना कोरोनाने महापौर किशोरी पेडणेकरांच्या मोठ्या भावाचा केला घात!!

मुंबई | दोन दिवसांवर म्हणजेच सोमवारी 3 तारखेला रक्षाबंधन आहे. मात्र दोन दिवसांआधीच कोरोनाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांच्या मोठ्या भावाचा घात केला आहे. कोरोनाने त्यांचा बळी घेतला आहे.  किशोरी पेडणेकरांनी एक कविताही पोस्ट केली आहे.

सुनिल कदम असं किशोरी पेडणेकरांच्या मोठ्या भावाचं नाव आहे. त्याचं आज कोरोनामुळे निधन झालं आहे. गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांनी आज अखरेचा श्वास घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर या 14 दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. त्यावेळी सुनिल कदम यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, लढला असेल शेवटपर्यंत पण कुठे तरी तो थकला… पण तुम्ही कोण ठरवणारे तो परिस्थितीसमोर वाकला… घेत होता भरारी उंच नभात पण कुठेतरी आभाळ फाटलं… पण तुम्ही कोण ठरवणारे त्याला जगावंस नाही वाटलं… सुनील तुझी आठवण….. , अशी कविता किशोरी ताईंनी आपल्या भावासाठी पोस्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”

सुशांतच्या जवळच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा; सुशांत बेशुद्ध अवस्थेत असायचा तेव्हा रिया…

खळबळजनक! भाजपचे 40 आमदार माझ्या संपर्कात; बच्चू कडूंचा गौप्यस्फोट

“अमित शहांच्या डोक्यात दिवसरात्र सरकार पाडण्याचा विचार असतो”

झोपेत असलेल्या तरुणाच्या पॅंटमध्ये कोब्रा नाग शिरला अन्…